मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकास अटक

नाशिक (प्रतिनिधी) :– मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षामार्फत एका अपहृत मुलीचा शोध घेऊन तिच्यासह एका संशयितास ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलिसांच्या हवाली केले आहे.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 363 अन्वये गुन्हा दाखल होता. त्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी यांना अपहृत मुलगी ही औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथे असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी, पोलीस नाईक गणेश वाघ व महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली घरटे यांच्या पथकाने वडगाव कोल्हाटी येथे जाऊन अपहृत मुलगी व एका संशयितास ताब्यात घेतले.

पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!