पुण्यात पीएफआय प्रकरणाचे तीव्र पडसाद

पुणे : राष्ट्रीय तपास एजन्सीने पुण्यासह संपूर्ण राज्यात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवरील छापेमारीविरोधात शुक्रवारी (दि. २३) पुण्यामध्ये आंदोलन केले होते. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी मात्र या घटनेवर मौन बाळगले आहे. पोलिसांकडून या व्हिडिओबाबत आणि त्यात देण्यात आलेल्या घोषणाबाजीबाबत अद्याप कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण याप्रकरणी पीएफआयचा कार्यकर्ता रियाज सय्यद याच्यासह ६० ते ७० इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अनधिकृतरित्या निषेध आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेसंदर्भात भाजपच्या नेत्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आमदार राम सातपुते यांनी पुणे पोलीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की, पुण्यात पीएफआय च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये.

https://twitter.com/RamVSatpute/status/1573551476244463616?s=20&t=GyR4joU5trQRc1BqN8kCFQ

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!