उद्धव ठाकरे- फडणवीस यांच्यात फोन संभाषण ; ’मातोश्री’वरून आला‘हा’ खुलासा

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):-शिवसेनेचे नेते एकनाथ शिंद यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर कोसळणार अशी चर्चा रंगली आहे. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची चर्चा रंगली आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही फोन कॉल केला नव्हता असा खुलासा शिवसेनेनं केला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांना कारवाई करण्यापासून एकाप्रकारे संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अशातचएकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती.

शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून याच्या पाठीमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली. पण, शिवसेनेनं हे वृत्त फेटाळून लावले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना असा कोणताही फोन केला नाही. ’सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला : सूत्र’, अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात, कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असा खुलासा आणि आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!