अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून पायलटचा मृत्यू

अरुणाचल प्रदेश : येथील तवांग जवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला आहे. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागामधून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते.

लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या एका वैमानिकाचा रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, दुसऱ्या पायलटवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पायलट लेफ्टिनंट कर्नल सौरभ यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीमध्ये अपघाताचे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!