नाशिक | चंद्रशेखर गोसावी : अजान विरोधात नाशिकमध्ये देखील पहाटेच्या सुमारास आंदोलन झाले. पहाटे अजान सुरू होताच मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. तातडीने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आज 4 मे रोजी भोंग्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन नाशिकमध्ये पहाटपासूनच सुरू झाले. दूध बाजार येथील मशिदीमध्ये अजान सुरू होताच मनसे कार्यकर्त्या आणि माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी श्रीरामाच्या घोषणा देत तीव्र विरोध केला. पोलिसांना ही घटना की लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांनी सुजाता डेरे आणि त्यांच्यासमवेत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना अटक केली.

दुसरीकडे जुने नाशिक परिसरामध्ये असलेल्या छप्पराची तालीम याठिकाणी असलेल्या छोट्या मंदिरात अज्ञात व्यक्तीने समोरच्या मशिदीमध्ये सुरू असलेल्या मशिदीत अजान सुरु होताच तातडीने हनुमान चालिसाचा भोंगा लावुन सुरू केला. ही घटना पोलिसांना समजताच तातडीने पोलिसांनी या ठिकाणी असलेला भोगा हा जप्त केला आहे. याठिकाणी अज्ञात व्यक्तींनी हा भोंगा सुरू केला होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस कारवाई करत आहे. पहाटे दोन वाजल्यापासून नाशिक शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांनी आपली गस्त सुरू केली.
अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व ठिकाणी पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. सातपूर परिसरामध्येही पोलिसांकडून काही भोंगे जप्त करण्यात आल्याचे समजते.