नाशिककरांसाठी खास अशी ख्यातनाम शास्त्रीय गायक महेश काळे ह्यांची स्वरसंध्या ही भारतीय शास्त्रीय संगीताची मैफील लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी ने आयोजित केली आहे. आज सायंकाळी ६ वाजता नाशिक मधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केली आहे.

महेश काळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय संगीतकार म्हणून सर्वानाच परिचित आहेत, शास्त्रीय (हिंदुस्थानी), अर्ध-शास्त्रीय, नाट्य संगीतासह भक्ती संगीतातील त्यांच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शास्त्रीय कलाकृतीसाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ते शिष्य आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय तसेच उस्ताद झाकीर हुसेन, शिवमणी आणि त्रिलोक गुर्टू यांसारख्या जगप्रसिद्ध तालवादक आणि पेड्रो युस्टाचे आणि फ्रँक मार्टिन सारख्या वादक आणि प्रसिद्ध संगीतकार आणि सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रूक्स आणि ग्रूव्ह-मास्टर यांसारख्या जॅझ कॉन्सर्टमध्ये फ्यूजन कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले आहे .त्यांनी नवीन पिढीला शास्त्रीय संगीताची शिकवण देण्याच कार्य हाती घेतल असून हजारो विद्यार्थ्यांना सांगीतिक प्रशिक्षण दिले आहे. ते कलर्स मराठी टी वी वरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचे परीक्षक व मार्गदर्शक म्हणून सर्वाना सुपरिचित आहेत.
स्वरसंध्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका कालिदास कलामंदिर व नाशिक शहरातील सर्व लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटीच्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत, अधिक माहितीसाठी पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा ९४२२७७६३८४, ७०३०६३६९०६. आणि ९५११२३९७७५.