नाशिकचा प्रसन्न सुराणा सीए आयपीसीसी परीक्षेत भारतात 11 वा

नाशिक :– नाशिकचा प्रसन्नकुमार प्रफुल्ल सुराणा याने सीए आयपीसीसी परीक्षेत संपूर्ण भारतात 11वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रसन्न सुराणा याने सीए फाऊंडेशन परीक्षेत देखील देशात 3रा क्रमांक मिळवला होता. शालेय जीवनात देखील इयत्ता 10वी मध्ये 97 टक्के तर 12वीत 93 टक्के गुण मिळवले होते. प्रसन्नचे आई-वडील दोघेही डॉक्टर असून मोठी बहीण सीए झालेली आहे.

हे यश मिळवण्यासाठी प्रसन्नला आई, वडील व त्याचे शिक्षक माइंड स्पार्क अकॅडमीचे संचालक मयूर संघवी व त्यांच्या टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रसन्न सोबत नाशिक मधील याच क्लास मध्ये शिकलेली गौरी लखोटीया ही देखील देशात 43 वी आली आहे.

संपूर्ण भारतामध्ये सीए इंटरमिजिएट या परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमात 129742 इतके विद्यार्थी 730 इतक्या केंद्रांवर बसले होते व संपूर्ण भारतामध्ये सीए इंटरमिजिएट या परीक्षेच्या जून्या अभ्यासक्रमात 36036 इतके विद्यार्थी 481 इतक्या केंद्रांवर बसले होते.

संपूर्ण भारतामध्ये नवीन अभ्यासक्रमात पहिल्या ग्रुपसाठी 79822 इतके विद्यार्थी बसले होते त्याच्या पैकी 17387 इतके पास झाले. दुसऱ्या ग्रुपसाठी 62029 इतके विद्यार्थी बसले होते त्याच्या पैकी 7327 इतके पास झाले. दोन्ही ग्रुप एकाच वेळेस देणारे ग्रुपसाठी 31136 इतके विद्यार्थी बसले होते त्याच्या पैकी 3598 इतके पास झाले.

संपूर्ण भारतामध्ये जुन्या अभ्यासक्रमात पहिल्या ग्रुपसाठी 7427 इतके विद्यार्थी बसले होते त्याच्या पैकी 400 इतके पास झाले. दुसऱ्या ग्रुपसाठी 20289 इतके विद्यार्थी बसले होते त्याच्या पैकी 3407 इतके पास झाले. दोन्ही ग्रुप एकाच वेळेस देणारे ग्रुपसाठी 3295 इतके विद्यार्थी बसले होते त्याच्या पैकी 30 इतके पास झाले.

चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए या राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत नाशिक मधून विद्यार्थी राष्ट्रीय क्रमवारीत येणे हे संपूर्ण नाशिक साठी अतिशय अभिनंदनीय व हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक गोष्ट आहे. पूर्वी सीए करण्यासाठी विद्यार्थी मुंबई किंवा पुणे येथे जात असे परंतु आता नाशिक मध्ये उच्चस्तरीय मार्गदर्शन उपलब्ध आहे व यासोबतच नाशिकचे विद्यार्थी राष्ट्रीय क्रमवारीत झळकत आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात नाशिक हे सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन केंद्र निर्माण होणार आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांनी मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थ्याकडून प्रेरणा घेऊन नाशिकचे नाव अजून उज्वल करावे.

-प्रा सीए लोकेश पारख
मुख्य शिक्षक पारख क्लासेस
सरचिटणीस
नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस चालक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!