मुंबई – देशात महागाइने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. पेट्रोल, डीझेल, गॅस यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य जनतेची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आज शिंदे सरकारने नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधन दर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे.
मागील काही दिवसांत पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केंद्र सरकारने मध्यंतरी पेट्रोल व डीझेलचे दर कमी केले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने दर केली नव्हते. पेट्रोलच्या दरात 5 आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.