पुणे (भ्रमर वृत्तसेवा):– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जून रोजी देहूत दाखल होत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर शिळा मंदिर आणि मुख्य मंदिर परिसराची पोलीस महासंचालक रजनीश् सेठ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, मंचक इप्पर यांनी पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आचार्य तुषार भोसले आणि देहू संस्थानाचे विश्वस्त मंडळींनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. येत्या 20 जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे.