नाशिकरोडला मटका अड्ड्यावर छापा

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड येथे शिवाजी पुतळ्याजवळ भाजी बाजारात कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १९०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्‍त केले आहे.

आरोपी गणेश नीळकंठ कुलथे (वय ३१, रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव, नाशिकरोड) हा काल दुपारच्या सुमारास शिवाजी पुतळ्याजवळील भाजी बाजाराजवळ राजेंद्र कॉलनीतील इलेक्ट्रिकल डीपीच्या बाजूला स्वत:च्या फायद्यासाठी अंक-आकड्यावर कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला.

यावेळी पोलीस पथकाने त्याच्याकडील १९०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्‍त करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोेलीस निरीक्षक ढगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!