माया सोनवणेचे दोन बळी ; महाराष्ट्राला उपविजेतेपद

सुरत (भ्रमर वृत्तसेवा) – महाराष्ट्र संघाने उभारलेले आव्हान 18.1 षटकात पार करत सीनियर महिला संघाचे विजेते पदक रेल्वे संघाने पटकावले.

सीनियर महिलांच्या टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने 160 धावांचे आव्हान रेल्वेच्या महिला संघाने 18.1 षटकात पार केले. रेल्वेतर्फे मेघना हिने 52 तर हेमलताने 65 धावांची खेळी केल्याने रेल्वे संघाला सहज विजय मिळवता आला. नाशिकच्या माया सोनवणे हीने 3.1 षटकामध्ये 22 धावा देत दोन गडी बाद केले.

येथे झालेल्या लालजीभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.आज कर्णधार स्मृती मानधना आणि तिची सहकारी एस. एस. शिंदे या दोघींनी जबरदस्त सुरुवात केली. दोघींना आक्रमक रूप धारण करत रेल्वे संघाच्या गोलंदाजांना चांगलाच तडाखा दिला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिंदे हिने 25 चेंडूत 30 धावा वसूल केल्या.

तिने चार चौकार ठोकले शिंदे बाद झाल्यानंतर हसबनीस हीने 15 धावांची छोटीशी केली.कर्णधार स्मृती मानधनाने जबरदस्त खेळी केली. तिने 54 चेंडू मध्ये 84 धावा केल्या. त्यात तिने 11 चौकार आणि तीन षटकार खेचले. त्यामुळे महाराष्ट्राला 20 षटकात 4 बाद 160 धावा करता आल्या.

येथे झालेल्या लालजीभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.आज कर्णधार स्मृती मानधना आणि तिची सहकारी एस. एस. शिंदे या दोघींनी जबरदस्त सुरुवात केली. दोघींना आक्रमक रूप धारण करत रेल्वे संघाच्या गोलंदाजांना चांगलाच तडाखा दिला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिंदे हिने 25 चेंडूत 30 धावा वसूल केल्या. तिने चार चौकार ठोकले शिंदे बाद झाल्यानंतर हसबनीस हीने 15 धावांची छोटीशी केली.कर्णधार स्मृती मानधनाने जबरदस्त खेळी केली. तिने 54 चेंडू मध्ये 84 धावा केल्या. त्यात तिने 11 चौकार आणि तीन षटकार खेचले. त्यामुळे महाराष्ट्राला 20 षटकात 4 बाद 160 धावा करता आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!