मुंबई (भ्रमर वृत्तसेवा): – 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे, कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस जास्त पडतो. यावर्षी देखील मान्सून पूर्वेकडूनच आला असून, पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे डख यांनी सांगितले. माढा तालुक्यातील मानेगाव येथील कार्यक्रमात डख बोलत होते.

6 जूनला मान्सून मुंबईत तर 7 जूनला बहुतांश महाराष्ट्रात पाऊस बरसेल. तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचे डख यांनी सांगितले.