नाशिक (प्रतिनिधी) :– राज्यात सध्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर पावसामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधार पावसात वीज कोसळून काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाला आहे. यातच आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यात इतर ठिकाणांप्रमाणेच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नाशिकमध्ये आलेल्या पुरात काका पुतणीसह तीन जण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील कोचरगावमध्ये हे काका आणि पुतणी नदी पार करत होते. यात काका आणि 6 वर्षाची मुलगी वाहून गेल्याची घटना घडली. स्थानिकांना यात काकाला वाचवण्यात यश आले आहे. तर मुलगी बेपत्ता आहे.
तसेच त्र्यंबक येथील तळेगावमध्ये 34 वर्षीय व्यक्ती किकवी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.