नाशिक :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिकच्या अधिकृत संकेतस्थळाचे तसेच “युवा जोडो अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते “शिवतीर्थ’ येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर हे उपस्थित होते. मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ यांच्या संकल्पनेतून सदर संकेतस्थळ व युवा जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने विशेष युवा जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील युवकांचा संघटनेत सक्रिय सहभाग करुन घेण्यात येणार आहे.

नोंदणी करणार्या युवकांचे नोकरीसह इतर अनेक प्रश्न या माध्यमातून सोडविले जाणार आहे. होतकरु युवकांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. या अभियानासाठी विशेष संकेतस्थळ (website) तयार करण्यात आली असून त्याचे बारकोड स्कॅन केल्यावर आतमध्ये माहिती भरण्यासाठी फॉर्म राहणार आहे. यामध्ये युवक आपली संपूर्ण माहिती देऊ शकतात. त्याच प्रमाणे नोकरी, शिक्षण आदींबद्दल काही प्रश्न असले तर त्याची नोंद यामध्ये करता येणार आहे. याद्वारे मिळालेल्या माहितीची दखल पक्षाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे व विविध लहान मोठ्या कंपन्या आदी आस्थापना यांच्याशी चर्चा करुन नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी सांगितले.