आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेआधी पदाधिकार्‍यांना नोटीसा

औरंगाबाद (भ्रमर वृत्तसेवा):- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर होत असलेल्या राज ठाकरेंच्या या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणार्‍या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. दरम्यान या सभेआधी मनसेच्या अनेक पदाधिकार्‍यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना जे लोक कायदा पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवा असे आव्हानच दिलेआहे.

आम्ही सर्वांनी गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंची ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या या सभेतनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आजची सभा ही ऐतिहासिक सभा असेल. कारण या सभेकडे फक्त संभाजीनगर, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
3 मेच्या अल्टिमेटमसंबंधी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे कायद पाळा असं सांगत असून सरकारने तो पाळला पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायदा पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!