मुंबई :- मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. तत्पूर्वी त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत त्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

त्यात राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या सभेचा उल्लेख करत मनसैनिकांना त्यांच्या शस्त्रक्रियेचे आठवण करून दिली. त्यांनी आपल्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्याने घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचंही नमूद केले.

ठाकरे म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितले की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचे सांगितले. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरे वाटते”.
“असे असले तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे.”
https://twitter.com/RajThackeray/status/1535963415583535104?t=BzG3yjHs0IH8onHtNC095g&s=19