महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र लिहिले आहे. मशिदीं वरील भोंग्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, त्यासाठी कामाला लागा असे ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी लिहिले आहे, की माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.
याचबरोबर, “मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.” असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1532322001553002497?t=qMEW_F-99n__-5stML19Pg&s=19