जालना :- मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण आढळले असून त्यात 2 लहान मुलींचाही समावेश आहे. मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडले. बी.ए. 5 चे तीन आणि बी ए.5 व्हेरीयंटचा एक रुग्ण सापडला आहे.

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत कोरोनाचे स्वॅब तपासल्यानंतर नव्या व्हेरियंटचे रुग्ण असल्याचे समोर आले. राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 1 हजार 885 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 1 हजार 118 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी राज्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाची चौथी लाट आली असली तरी काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे पण काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी मास्क वापरवा आणि लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
नागरीकांना बूस्टर डोस मोफत देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.