राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अपयशी; निवडणूक होणारच

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- राज्यसभा निवडणूक होणारच, शिवसेनाही उमेदवार मागे घेणार नाही,सूत्रांची माहिती, घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सायंकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभेच्या निवडणूकीबाबत काँग्रेस एनसीपी नेत्यांसमवेत चर्चा करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना 8 ते 10 जून अशी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर राहण्यासाठी येण्याचे शिवसेनेचे आदेश.

राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना 8 जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई येणार्‍या शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. 8 जून ते 10 जून अशी व्यवस्था करण्यात आलीय. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडा फोडी होऊ शकते त्यासाठी शिवसेनेनें आतापासूनच रणनिती आखल्याची माहीती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!