इंदूर: रामनवमीच्या दिवशीच मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहीरी वरील छत कोसळून त्या विहिरीत अनेक लोक पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत केसळल्याने सुमारे 50 जण विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि १०८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाहीत.