नाशिक :– नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रमेश पवार हे सध्या मुंबई महानगरपालिकेत सहआयुक्त पदावर कार्यरत आहेत. पवार यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असे आदेश काढण्यात आले आहे.

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पवार यांच्या नेमणुकीचे आदेश आज पारित केले आहेत.