सिनिअर महिलांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रसिका शिंदे, माया सोनवणे चमकल्या

गुवाहाटी (भ्रमर वृत्तसेवा) : येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या सिनिअर महिलांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाशिकच्या माया सोनवणे आणि रसिका शिंंदे या खेळाडूंनी महाराष्ट्राकडून खेळतांना चमकदार कामगिरी केली. मात्र त्या महाराष्ट्र संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. हिमाचलप्रदेश संघाने ६२ धावांनी विजय मिळवला.

येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात हिमाचल प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५० षटकात ९ बाद २४२ धावा केल्या. महाराष्ट्राकडून नाशिकच्या माया सोनवणे हिने उत्तम फिरकी गोलंदाजी केली. तिने १० षटकात ५४ धावा देत ३ गडी बाद केले. आरती केदार आणि एम.आर. मगरे यांनी दोन-दोन गडी बाद केले. हिमाचल प्रदेशच्या धावसंख्येला उत्तर देतांना महाराष्ट्राचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

मात्र नाशिकची रसिका शिंदे हिने एक बाजू लावून धरत धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. तिने सुरूवातीला माया सोनवणे हिच्याबरोबर सहाव्या विकेटसाठी १० तर सातव्या विकेटसाठी एस.बी.पोखारकर हिच्याबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. रसिका शिंदे हिने ३० धावा करीत ३ चौकार आणि एक षटकार खेचला. एस.बी. पोखारकर हिने नाबाद २८ धावा केल्या. निर्धारीत ५० षटकात महाराष्ट्राने ९ बाद १८० धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!