नाशिक :– जय श्रीरामाच्या गजरात पारंपरिक रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोरोनामुळे 2 वर्ष रथोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. यंदा मात्र नागरिकांनी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उत्सव मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जय श्रीराम, जय सीताच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.