भारताच्या बचावात्मक फलंदाजीवर रवी शास्त्री भडकले

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी केलेल्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी घाबरून रक्षात्मक खेळ केला, ज्यामुळे मॅचमध्ये इंग्लंडचं कमबॅक झाल्याचं रवी शास्त्री म्हणाले. पहिल्या इनिंगमध्ये 132 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसर्‍या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 245 रनवर ऑल आऊट झाला.
रवी शास्त्री स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री टीममध्ये आहेत.

भारतीय बॅट्समनना या टेस्टमधून इंग्लंडला बाहेर काढण्याची संधी होती. त्यांना 2 सत्र बॅटिंग करण्याची गरज होती, पण मला वाटतं ते रक्षात्मक खेळत होते आणि घाबरले होते. खासकरून लंचनंतर, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. विकेट गेल्यानंतरही ते धोका पत्करू शकले असते, त्यावेळी रन जास्त महत्त्वाच्या होत्या. भारताने पटापट विकेट गमावल्या, त्यामुळे इंग्लंडला बॅटिंगसाठी वेळ मिळाला, असं वक्तव्य शास्त्री यांनी केलं.

मॅचच्या चौथ्या दिवशी पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांनी चुकीचे शॉट मारले, तर रवींद्र जडेजा बचावात्मक खेळताना दिसला. पुजाराने ऑफ स्टम्पबाहेरचा बॉल कट मारण्याचा प्रयत्न केला, पण पॉईंटला उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात कॅच केला. यानंतर श्रेयस अय्यरवर इंग्लंडच्या फास्ट बॉलरनी बाऊन्सरचा मारा केला, या सापळ्यात अय्यर अडकला. तर ऋषभ पंतने रिव्हर्स स्वीप मारली आणि तो कॅच आऊट झाला.

शार्दुल ठाकूरही बाऊन्सरवर हूक मारायला गेला. रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असताना भारताने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली होती, पण टीम इंडियामध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे पाचवी टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. ही टेस्ट आता खेळवली जात आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने जसप्रीत बुमराहच्या कर्णधारपदावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं आहे. बुमराहने डिफेन्सिव फिल्डिंग लावल्यामुळे इंग्लंडच्या बॅट्समनना एक-एक रन काढून स्ट्राईक बदलायला मदत झाली, असं पीटरसन म्हणाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!