मुंबई :- बहुप्रतिक्षित दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने काल पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.

देशातील 5000 चित्रपट गृहां मध्ये हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर चाहते RRR चित्रपटाचे रिव्ह्यू देतांना प्रत्येक व्यक्तीला RRR चित्रपटातले सगळ्यात जास्त काय आवडले हे सांगत आहेत. RRR चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्येच नाचत गाजत चित्रपट पाहिला.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली. त्यामुळे वीकेंडला आणि येत्या काही दिवसांत हा चित्रपट कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.