नाशिक (प्रतिनिधी):– गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

अनेक नद्या, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक पुल पाण्याखाली गेले असून, गोदावरीच्या पातळीही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाकाठी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

वेधशाळेने 14 जुलैपर्यंत नाशिकमध्ये रेडअलर्ट जारी केला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली. आज चार वाजता गंगापूरधरणातून 10 हजार 35,कडवामधून 6 हजार 712, दारणातून 15088 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.