आयपीएल 2022 साठी रिलायन्स जिओने लाँच केले क्रिकेट प्लान्स

नवी दिल्ली :- आजपासून आयपीएलच्या 15व्या हंगामास सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात १० संघ स्पर्धेत सहभागी झाल्याने हे सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमीदेखील उत्सुक आहेत.

आयपीएल २०२२ स्पर्धा २९ मे पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील उत्कंठा वाढवणारे सामने पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे. चालता फिरता मॅच बघता यावी यासाठी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी २७९ रुपयांचा नवीन क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये १५ जीबी मोबाईल डेटा उपलब्ध आहे. हा अॅड-ऑन पॅक असल्याने व्हॉईस कॉलिंग मिळणार नाही. इंटरनेट डेटासह,या प्लॅनमध्ये एक वर्षाचे Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. रिलायन्स जिओ क्रिकेट अॅड-ऑन प्रीपेड २७९ रुपयांचा प्लॅन युजर्सच्या विद्यमान प्लॅनची ​​वैधता संपेपर्यंत सक्रिय असेल.

नवीन प्रीपेड क्रिकेट अॅड-ऑन योजना MyJio अॅपद्वारे उपलब्ध आहे. जिओचा २७९ रुपयांचा क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन सध्या फक्त निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. कंपनी सध्या ७ वेगवेगळ्या क्रिकेट प्लॅन ऑफर करत आहे. यातील सर्वात स्वस्त प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरू होतो, तर सर्वात महागड्या प्लॅनची ​​किंमत ३,११९ रुपये आहे. या सर्व योजना Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत देतात. जिओच्या ४९९ रुपयांच्या क्रिकेट प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दैनिक मर्यादेसह दररोज २ जीबी मोबाइल डेटा देते. त्याचप्रमाणे ५५५ रुपयांच्या क्रिकेट प्लॅनची ​​वैधता ५५ दिवस आहे आणि ५५ जीबी इंटरनेट डेटासह येतो.

https://twitter.com/reliancejio/status/1505195508071079939?t=t_1ipmRyN02k1HUhW8rMHQ&s=19

प्लॅनमध्ये एसएमएस किंवा कॉलची सुविधा नाही. ६०१ रुपयांच्या क्रिकेट प्रीपेड प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह ९० जीबी एकूण इंटरनेट डेटा आणि १०० एसएमएस प्रतिदिन येतो. रिलायन्स जिओच्या ६५९ रुपयांच्या क्रिकेट प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी मोबाइल डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता ५६ दिवसांची आहे आणि यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग डेटा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!