नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्त्वाची देणगी लाभली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले होते, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक आज दादर येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करतील. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही याठिकाणी येतील.

त्यानंतर आज संध्याकाळी षणमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. यावेळी ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. सेंट्रल हॉलमधील बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. या सोहळ्याला राज ठाकरे आणि निहार ठाकरे उपस्थित राहतील.
https://twitter.com/narendramodi/status/1485069738858680321?s=20&t=uopqnq_MP-DdB6Js_1OGVA