नाशिक (प्रतिनिधी) :– महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण शेवाळे (वय 21, रा. आशापुरा सोसायटी, निशांत ब्लेज सोसायटीजवळ, पंचवटी, नाशिक) असे लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीचे नाव आहे. शेवाळे याने मार्च व एप्रिल 2021 ते दि. 29 जुलै 2022 या काळात पीडित महिलेचा वेळोवेळी पाठलाग करून तिचा मोबाईल नंबर बळजबरीने मिळविला. त्यानंतर तिला व्हॉट्सअॅप, टेक्स्ट मेसेज, तसेच फोन करून तिच्याशी मैत्री केली.
तिची इच्छा नसताना शेवाळे याने मानेनगर परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये, तसेच पीडितेच्या घरी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात भूषण शेवाळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.