रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात इतकी वाढ; सर्व प्रकारच्या कर्ज, व्याजदरात वाढ

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- रिझर्व्हे बँकेने रेपो दरात आणखी 50 आधारबिंदूची (.50) वाढ केली आहे. त्यामुळे सध्या रेपो दर 5.4 टक्के इतका झाला आहे. या रेपो दरवाढीमुळे वाहन, गृह व इतर सर्व प्रकारच्या कर्जाचे आणि परतफेडीचे व्याजदर वाढणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरवाढीसह 2022-23 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्के इतका वर्तवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत 16.2 टक्के, दुसर्‍या तिमाहीत 6.2 टक्के, तिसर्‍या तिमाहीत 4.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4 ते 4.1 टक्के असा असेल. 2023-24 मध्ये प्रत्यक्ष जीपीडी वाढ 6.7 टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बँकांना पत निर्मितीसाठी म्हणजेच दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो दर म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात झाल्यास बँकांना मध्यवर्ती बँकेकडून कमी दराने कर्ज मिळते. परिणामी बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. या उलट रेपो दरात वाढ झाल्यास बँकांना ज्यादा दराने कर्ज मिळत असल्याने बँकाकडून ग्राहकांना देण्यात येणार्‍या कर्जांचे दर वाढवतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!