सुरत-गुवाहाटी’ फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस!

 मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी मोजक्याच आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि नंतर गुवाहाटीला पोहोचले. अत्यंत गुप्तपणे ही मोहिम राबवण्यात आली आणि ही मोहिम फत्ते केली होती भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी.

आज रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन एका प्रकारे बक्षीस देण्यात आले आहे.
शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार. आज पार पडला आहे. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडला आहे. राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकूण 18 मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी जेव्हा रवींद्र चव्हाण यांचे नाव घेण्यात आले तेव्हा सर्वच भाजपच्या नेत्यांनी टाळ्यावाजून अभिनंदन केलं. रवींद्र चव्हाण यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला आहे. लवकरच खातेवाटप जाहीर होणार आहे.

गुवाहाटी येथे चव्हाण यांच्यानंतर भाजपचे आणखी एका बडा नेता ठाण मांडून होते. पुढील हालचाली हे दोन नेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावर करत होते. अखेर गुवाहाटीला मुक्काम ठोकला. याच काळात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टाने सुनावणी लांबणीवर टाकली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर गुवाहाटीवरून सर्व आमदार गोव्यात आले आणि तिथून मुंबईत पोहोचले. या सर्व मोहिमेत चव्हाण हे सावली सारखे शिंदे गटासोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!