मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास “इतक्या” दराने महागला

मुंबई : पुण्यात रिक्षाचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबईतही रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आह. या निर्णयावर सोमवारी (दि. २६)  शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.

काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असतांना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरामध्ये कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ केली. राज्यसरकारकडून भाडेवाढ करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रिक्षा टॅक्सी चालकांनी २६ तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.

१३ सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठकीमध्ये निर्णय न झाल्याने टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. रिक्षा, टॅक्सी चालकांच्या संपापूर्वी सरकारकडून तातडीची बैठक घेण्यात आली. सध्या सीएनजी गॅसचा दर ८० रुपयांवर पोहचला आहे. देशातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!