‘खतरों के खिलाडी 13’च्या शूटिंगला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करताना अभिनेता रोहित रॉय जखमी झाला आहे. त्यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित रॉयने ‘खतरों के खिलाडी 13’चं शूटिंग पूर्ण करावं, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. पण त्याची जखम बरी होण्यासाठी वेळ लागू लागतो. रोहित रॉयलादेखील हा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. पण गंभीर दुखापत झाल्याने रोहित रॉय मुंबईला येऊ शकतो.
‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षिततेकडे आमचं पूर्पपणे लक्ष आहे. आता रोहित रॉय ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. रोहित रॉय नक्की कोणतं स्टंट करताना जखमी झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही.
‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होण्याबद्दल रोहित रॉय म्हणालेला,”खतरों के खिलाडी 13’मध्ये स्टंट करताना निर्माते स्पर्धकांची खूप काळजी घेतात. स्टंटबाजी करताना मलादेखील स्वत:ची काळजी घ्यायला हवी. साहसी खेळादरम्यान सुरक्षिततेला महत्त्व द्यायला हवं”.