रोहित शर्माच्या नावावर “हा” नवा विक्रम; ठरला पहिलाच भारतीय क्रिकेटपटू

काल इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक झळकावत कर्णधार रोहित शर्माने नविन विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम खेळी करत देत नाबाद 76 धावा ठोकल्या. रोहितने या सामन्यात 5 षटकार ठोकले असून यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत 231 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 49 च्या सरासरीने आणि 89.25 च्या स्ट्राईक रेटने 9359 धावा केल्या आहेत. ज्यात 29 शतक आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी 264 धावा आहेत. या दरम्यान, त्याच्या बॅटीतून 250 षटकार तर 852 चौकार ठोकले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने 398 सामन्यात 351 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने 301 सामन्यात 331 षटकार मारले असून नंतरचा नंबर माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याचा लागतो. त्याने 445 एकदिवसीय सामन्यात 270 षटकार मारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!