मुंबई :- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुपाली ही छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माहितीनुसार, रुपाली गांगुली सुरुवातीला एका दिवसासाठी १ लाख ५० हजार रुपये मानधन घेत होती. आता मात्र ती एका दिवसासाठी ३ लाख रुपये मानधन घेते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपमा मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुधांशु पांडे आणि गौरव खन्ना हे रुपालीच्या तुलनेत खूप कमी मानधन घेतात. असे म्हटले जाते की दोन्ही अभिनेत्यांना १.५ लाख रुपये मानधन म्हणून मिळते.
रुपाली अभिनेत्रींमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते राम कपूर, रोनित रॉय सारख्या कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेते.