मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):– बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
