संजय राऊत यांनी ईडीवर केला “हा” गंभीर आरोप

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ’मला श्‍वास घेण्यास त्रास होत असून खिडकी नसलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप ईडीवर केला आहे.

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना प्रथम 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांची कोठडी संपल्यामुळे न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्
कोर्टाने संजय राऊत यांना विचारले की, तुमची ईडीविरोधात काही तक्रार आहे का? त्यावर संजय राऊत यांनी न्यायालयाला सांगितले की, मला जिथे ठेवण्यात आले आहे तिथे व्हेंटिलेशन नाही.

मला हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे मला श्‍वास घेणे कठीण होत आहे. खोलीत खेळती हवा नसल्यामुळे त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी जिथे ठेवले जाते तिथे फक्त एक पंखा असल्याचेही राऊत यांनी न्यायालयाला सांगितले. यावर हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने ईडीला प्रश्‍न विचारला.

संजय राऊत यांच्या आरोपांवर ईडीकडून सांगण्यात आले की, संजय राऊत यांन एसीमध्ये ठेवले जात आहे. त्यावर न्यायालयाने राऊत यांना एसी लावला आहे का, अशी विचारणा केली, त्यावर संजय राऊत म्हणाले की, मी पाहिले नाही, तिथे पंखा आहे. मला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने मी एसी वापरत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!