संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा ‘इतक्या’ दिवसांची वाढ

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आता पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होणार आहे. आज संजय राऊत यांच्याकडील बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तर पुढील तारखेला ईडी आपली बाजू मांडणार आहे. स्पेशल पीएमएलए कोर्टमध्ये ही सुनावणी सुरू आहे. संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये आणखी १३ दिवसांनी वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचे या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झाले होते. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला.

त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचे समोर आले आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती.

त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचे समजले आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे आणि याची ईडीकडून चौकशी केली जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1574647296364400641?s=20&t=1QFCRJMQKSe2Mdrn4j20Qw

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!