सातपूर :– येथील राधाकृष्णनगर, अशोकनगर भागातील गुंठेवारी शिवारात आज पहाटे १२ ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास चोरटे व समाजकंटकानी एक दुचाकी चोरी व एक दुचाकी जाळून टाकली आहे. यामुळे सातपूर मधील श्रमिकनगर व राधाकृष्णनगर व इतर भागात भितीपूर्ण व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की गुंठेवारी शिवारात आज मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास (एमएच १५ एवाय ७४६४ पॅशन प्रो) संदीप काशिनाथ देवरे यांची दुचाकी जाळून टाकली असून, (एमएच १५ ईडब्ल्यू ७८२० होंडा शाईन) अनिल एकनाथ शिरसाठ यांची गाडी चोरट्यांनी चोरून नेली आहे. देवरे यांची दुचाकी चोरण्यात अयशस्वी झाल्याने चोरट्यानी सदर दुचाकी जाळून टाकली. यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण आहे.
या परिसरात ४ घरफोड्याची घटना होऊन ३ दिवस होत नाही तोच सदर घटना घडली असल्याने सातपूर वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १६ मार्च रोजी विश्वासनगर भागातून घरातून ५ ते ६ मोबाईल लंपास करण्यात आले होते.