नाशिक (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र विरुद्ध आसाम रणजी करंडकाच्या सामन्यात नाशिकच्या खेळाडू सत्यजित बच्छाव अष्टपैलू कामगिरी केली व आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले. दरम्यान आसाम विरुद्धच्या दुसऱ्या डावातही सत्यजित बच्छावने आत्तापर्यंत सामन्यात पाच बळी घेतले आहेत.
रोहटक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध आसाम सामन्यात नाशिकच्या सत्यजितने गोलंदाजीत फिरकीच्या जोरावर 25 धावात चार बळी टिपले. त्याचबरोबर फलंदाजीत देखील अर्धशतकी खेळी केली. त्याने सहा चौकार आणि षटकार ठोकत पन्नास धावा काढल्या. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या डावात 415 धावा केल्या.
त्याला उत्तर देताना आसामचा संघ 248 धावा करून परतला. त्यामुळे महाराष्ट्राने आसामला फॉलोऑन देत फलंदाजीसाठी बोलवले. दुसऱ्या डावातही आसामची अवस्था खराब झाली आहे. आसामने दुसऱ्या डावात बाद 82 धावा केल्या आहेत. त्यात सत्यजितने एक गडी बाद केला आहे. एकंदर सामन्यात त्याने 5 गडी बाद केले आहेत.