लासलगाव :- लासलगाव ग्रामपंचायत तसेच परिसरातील अभ्यासू विद्यार्थी भविष्यात राज्यात कुशल अधिकारी, पोलीस, सैनिक घडावेत या उद्देशाने लासलगाव ग्रामपंचायत अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके सरपंच जयदत्त होळकर यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करण्यात आले आहेत.

लासलगाव ग्रामपंचायत वाचनालयातील विद्यार्थी विशाल खुटे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली.

लासलगाव ग्रामपंचायतीच्या अभ्यासिकेत अभ्यास करून घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल विशाल खुटे यांचा सत्कार लासलगांव ग्रामपंचायतीचे सरपंच व मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त पाटील होळकर, ग्रामवीकास अधिकारी शरद पाटील, हेमंत पवार व जयदत्त होळकर मित्र परीवार उपस्थित होते.