वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

नाशिक (प्रतिनिधी) :- अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधील विविध पोलीस ठाण्यात काम केलेले ठाणे येथील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक संभाजी भगत यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यानिमित्ताने त्यांचे नाशिक, अहमदनगर, ठाणे जिल्ह्यातील हितचिंतक आणि सहकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दुरगाव (ता. कर्जत) येथील मुळचे रहिवासी असलेले अशोक भगत यांचे प्राथमिक शिक्षण दुरगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. पुढे त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी (अ‍ॅग्री) ही पदवी मिळवली. 1993 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड होऊन प्रथम 1994 ते 2004 नागपूर शहरातील पाचपावली , कोराडी, तहसील ,पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा येथे त्यांनी कर्तव्य बजावले. 2004 ते 2007- जळगाव जिल्हा शहर वाहतूक शाखा ,पहुर पोलीस स्टेशन, शेंदुर्णी दूर शेत्र येथे कर्तव्य बजावले.

सन 2007 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली नंतर 2008 नेमणूक नाशिक पोलीस आयुक्तालय ,नाशिक रोड पोलीस स्टेशन, विशेष शाखेत 2010 पर्यंत त्यांनी सेवा बजावली.

नंतर 2011 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,धुळे . सन 2011 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती ,व धुळे येथे विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नेमणूक झाली. 2014 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नाशिक आयुक्तालयात पुन्हा नेमणूक, यानंतर 2015 ते 2017 ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उपनगर पोलीस ठाणे ,सन 2018 मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून 2019 ते 2021 पंचवटी पोलीस स्टेशन येथे ते कार्यरत होते.नंतर ठाणे येथे बदली होऊन सप्टेंबर2021 पासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,गुन्हे शाखा ,ठाणे पोलीस आयुक्तालय येथे कार्यरत आहेत.

आजपर्यंत मिळालेले पुरस्कार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना आज पर्यंतच्या सेवेमध्ये मानाचे पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह 2016 मध्ये प्राप्त झाले. तर एकूण 28 वर्षांच्या सेवेत आजपर्यंत 465 बक्षीसे चांगल्या कामाबद्दल , गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल ,कायदा व सुव्यवस्था उत्कृष्टपणे हाताळल्याबद्दल वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेले आहेत. नागपूर, नाशिक ,जळगाव येथे नेमणुकीस असताना ,खून, दरोडा, जबरी चोरी ,बलात्कार , सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, मोटरसायकल चोरी ,अपहरण, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. खुनांच्या दोन गुन्ह्यांचा उत्कृष्टपणे तपास करून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तसेच लाच लुचपत प्रतिबंधक येथे नेमणुकीस असताना लाच स्वीकारणार्‍या नगर विकास विभागाच्या अधिकार्‍यास सात वर्षे शिक्षा उत्कृष्ट तपास केल्यामुळे झालेली आहे .

नाशिकमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये उत्कृष्टपणे सेवा करून पंचवटी मधील अनाथ ,भिकारी यांची राहण्याची, खाण्याची, औषध उपचाराची सोय केली करिता पोलीस विभागाकडे वरिष्ठ अधिकारी तसेच रोटरी क्लब नाशिक व इतर सेवाभावी संस्थांनी वेगवेगळे सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार दिलेले आहेत. या कामासोबतच स्वतःचे आरोग्यासाठी आज पर्यंत वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबई मॅरेथॉन सप्तशृंगी मॅरेथॉन लोकमत मॅरेथॉन स्टोन रिज मॅरेथॉन ,नाशिक पोलीस मॅरेथॉन ,मराठा विद्या प्रसारक मॅरेथॉन ,भाग घेऊन 42 किलोमीटर एक वेळेस ,सहा वेळेस 21 किलोमीटर व पाच वेळेस दहा किलोमीटर स्पर्धेत भाग घेऊन पूर्ण पूर्ण केलेली आहे.

याप्रमाणे पोलीस खात्याच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक आणि क्रीडाविषयक सहभागामुळे ते नाशिकमध्ये लोकप्रिय ठरले होते. त्यामुळेच त्यांचे नाशिकसह नगर आणि ठाणे जिल्ह्यात राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!