Nashik : कुटुंबीयांना मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी) :– कुटुंबीयांना मारून टाकीन, अशी धमकी देऊन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हिच्याशी आरोपी मजहर अन्वर खान या तरुणाने मैत्री केली. तिला मैत्रीच्या जाळ्यात गुंतविले. दि. 2 ते 8 एप्रिलदरम्यान “तुझ्या कुटुंबीयांना ठार मारून टाकीन,” अशी धमकी दिली. दरम्यान, आरोपी मजहर खान याने वारंवार धमकी देत त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केले.

या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने ही बाब तिच्या घरी सांगितली. त्यानंतर तिच्या पालकांनी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी मजहर खान याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!