नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने त्यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या मागणीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले होते.

त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले; परंतु बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून, न्यायालय याप्रकरणी सायंकाळी 5 वाजता सुनावणी घेणार आहे.

शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात म्हटले की, आम्ही मागच्या सुनावणीतच भीती व्यक्त केली होती, की पुढच्या काही दिवसात अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. ती भीती खरी ठरली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य आता न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.