नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालेकरच्या हत्या झाल्याने देशभर खळबळ माजवली आहे. तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलामध्ये फेकले आहेत. ही घटना ताजी असतानाच दिल्लीमध्ये पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूर्व दिल्लीमध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांचे गूढ उकलले आहे. दिल्लीमधील पांडव नगरमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह घरामध्ये कापून फ्रीझमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मारेकरी दररोज पांडव नगर आणि पूर्व दिल्लीच्या वेगवेगळ्या भागामध्ये मृतदेहाचे तुकडे फेकायचा. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अधिक माहितीनुसार, आई आणि मुलाने मिळून ही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते घरामधील फ्रीजमध्ये लपवून ठेवले आणि नंतर पांडवनगर परिसरामध्ये फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या हत्येचे आरोपी आई पूनम आणि मुलगा दीपक असून ज्याची हत्या करण्यात आली तो महिलेचा नवरा होता. अंजन दास यांची हत्या अवैध संबंधामधून झाल्याचे समोर आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1597111193373532160?s=20&t=t2hweZrnSlgwSK_KdoDwsA