धक्कादायक! बस दरीत कोसळून ‘इतक्या’ प्रवाशांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. त्यावेळी ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले होते. बस ५०० मीटर खोल दरीत पडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ घडली आहे. येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या एका दरीत ही बस कोसळली. बसमध्ये पन्नासपेक्षा जास्त प्रवासी होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

प्रांताधिकारी सदर प्रेमलाल टम्टा यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. धुमाकोट आणि रिखनिखल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही टम्टा यांनी दिली होती. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!