धक्कादायक: हवेत असतानाच उघडला एशियन एअरलाइन्स कंपनीच्या विमानाचा दरवाजा, अन् मग….

एशियन एअरलाइन्स कंपनीच्या विमानाचा दरवाजा विमान हवेत असतानाच उघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरण्यापूर्वी काही वेळ आगोदर शुक्रवारी (26 मे) हा धक्कायक प्रकार घडला. या विमानात 194 प्रवासी प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान अवकाशात असताना अचाकन दरवाजा उघडल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला. काही प्रवासी गुदमरले पण विमानाचे तातडीने आणि सुरक्षीत लँडीग करण्यात आले. त्यामुळे कणत्याही प्रकारची दुर्घटना झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अचानक उघडल्या गेलेल्या दरवाजामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. विमानातील एकूण प्रवाशांपैकी नऊ जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे @BNONews नावाच्या ट्विटर हँडलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

एशियन एअरलाईन्सचे हे विमान जेजू बेटावरुन हवेत झेपावले होते आणि 237 किलोमीटर अंतरावर असलेल्या डेगूच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, विमानात नेमके काय घडले हे कळण्याआधीच विमानाचा दरवाचा अचानक उघडला गेला. जेव्हा विमान हवेत होते. घडल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान विमानाचा उघडलेला दरवाजा पुढच्या काहीच क्षणामध्ये पूर्ववत बंद झाला. त्यामुळे विमानातून कोणी खाली पडले नाही. पण, त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. सांगितले जात आहे की, विमानात एक्झिटजवळ बसलेल्या एका प्रवाशाने दरवाजाच्या लिव्हरला स्पर्ष केल्याने दरवाजा उघडला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!