धक्कादायक! रशिया-गोवा विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

गोवा : रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याच्या धमकीनंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या विमानामध्ये अंदाजे दोन लहान मुलांसह २४० प्रवाशी प्रवास करत असून, सुरक्षेच्या कारणास्तव विमान उझबेकिस्तानला वळवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये २ मुले, ७ क्रू मेंबर्ससह एकूण २४० प्रवासी आहेत. अजूर एअर लाईन्सचे हे विमान रिशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याच्या दिशेने येत होते. मात्र, प्रवासादरम्यान, वैमानिकाला सुरक्षेसंबंधित अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर आपतकालीन परिस्थितीमध्ये विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे.

अजूर एअर लाईन्सचे AZV2463 विमानाच्या वैमानिकाला विमानामध्ये बॉम्ब असल्याचा अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. हे विमान शनिवारी पहाटे ४.१५ वाजता गोव्यामधील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते. डाबोलिम विमानतळ संचालकांना रात्री १२.३० वाजता विमानामध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल मिळाला होता. त्यानंतर गोव्याकडे निघालेले विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले.

https://twitter.com/PTI_News/status/1616671130861076480?s=20&t=yaOAp7kkFf1mRSutfYnw5Q

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!