तामिळनाडू : येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराच्या उत्सवामध्ये क्रेन कोसळून तीघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक माहितीनुसार, तामिळनाडूमधील राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या इथे किलीवेडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो भाविका या मेळाव्यामध्ये हजर होते. या उत्सवादरम्यान, एका क्रेनच्या मदतीने भलामोठा हार आणला होता. धक्कादायक म्हणजे, क्रेनला जिथे हार लटकलेला होता, त्यावर काही तरुण उभे होते. परंतु, अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली तेव्हा तोल जाऊन क्रेन खाली आदळली. त्यावेळी क्रेन अचानक कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, क्रेनखाली दबून ज्योती बाबू या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. किलावथम भूपालन आणि मजूर मुठ (४२) या मजुराचाही क्रेनखाली दबून मृत्यू झाला. या अपघातामध्ये एका मुलीसह ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोनम शासकीय रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.