सिन्नर जवळ तवेरा उलटल्याने “इतक्या” जणांचा जागीच मृत्यू

सिन्नर : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देवपूर फाट्याजवळ आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिर्डीहून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या मुंबईस्थित तवेरा जीपला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये जीप पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये भाईंदर व अंबरनाथ येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण व भाईंदर परिसरामधील एकमेकांचे नातेवाईक व मित्र मंगळवारी (दि. 29) साई दर्शनासाठी शिर्डी येथे मुक्कामी थांबले होते. मात्र आज सकाळी त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी जायचे असल्याने ते सिन्नर कडे जात असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ तवेरा जीप एमएच ०४ क्युझेड ९२२८ पलटी झाल्याने  अपघात झाला. वेगामध्ये असलेली जीप टायर फुटल्याने जवळपास दोनशे फूट फरफटत गेली.

या अपघातात इंद्रदेव दया शंकर मोरया (२५) रा. लोढा पार्क जवळ, भाईंदर पूर्व व सत्येंद्र सुखराज यादव (21) रा. बुवापाडा, अंबरनाथ या दोघांचा अपघात स्थळीच मृत्यू झाला. तर त्रिवेंद्र त्रिपाठी व रोहित मोरया या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने नाशिकच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर 5 तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आले.

अपघात घडल्यानंतर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक प्रकाश गवळी विजय सोनवणे हवालदार सतीश बैरागी, क्रेनचालक किरण पाटील, नितीन जगताप आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह अपघातग्रस्त वाहनामधून बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!